भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील एका भागात राहणाऱ्या विवाहितेचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. ही घटन रविवारी रात्री घडली. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरातील एका भागात ३१ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता संशयित आरोपी अक्रम शहा (पूर्ण नाव माहित नाही) रा. भुसावळ हा दुचाकी क्रमांक (एमएच १९ इइ ७७७) ने आला. व महिलेचा रस्ता अडून म्हणाला की, “मै तुम्हारे फेसबुक पर फ्रेंड रिक्वेस्ट भेजी है, तुम कोई जवाब देती नही, मैने मेसेज डाले है, उसकाभी जवाब तुमने दिया नही”, असे बोलून महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने भुसावळ बाजारपेठ पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी २३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजता संशयित आरोपी अक्रम शहा (पूर्ण नाव माहित नाही) रा. भुसावळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोउनि दिपक दुकडे करीत आहे