चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील मेहुणबारे परिसरातील विविध भागात चार बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वैद्यकिय पदवी नसताना रूग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. या कारवाईअंतर्गत मेहूणबारे परिसरातील पिलखोड येथे डॉ. संजय साळुंखे, डॉ. मृनाल टि. सरकार तर उपखेड येथील तन्मय दिपक पाठक, पोहरे येथे शहाजात कोमल मुजुंमदार या चौघांवर आज कारवाई करून चौघांना पथकाने मेहुणबारे पोलिस ठाण्यात जमा केले. दरम्यान, डॉ. संदीप निकम, दिपक वाणी, विलास भोई, आर. आय. पाटील, डॉ.धीरज पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.