TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : भरदिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश ; जळगाव एलसीबीची कारवाई !

रोकडसह दागिने, हत्यार जप्त ; चार चोरट्यांसह दोन सोनार अटकेत, इतर रडारवर !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 23, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर, भुसावळ, चाळीसगाव तसेच औरंगाबाद, नाशिक, पुणे या जिल्हात विविध अपार्टमेंटमध्ये घुसून भरदिवसा घरफोडी चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपींकडून रोकडसह आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना गुप्त बातमी मिळाली की जितेंद्र गोकु पाटील, अमोल गोकुळ पाटील, पवन ऊर्फ पप्पु सुभाष पाटील, सागर लक्ष्मण देवरे (सर्व. रा. मोहाडी ता. जामनेर), आकाश सुभाष निकम, महेंद्र ज्ञानेश्वर बोरसे (रा.नांद्रा पाचोरा), अमोल सुरेश चव्हाण (रा. सामनेर ता. पाचोरा) यांच्याकडे चोरीच्या गुन्हयांतील सोन्या-चांदीचे दागिने असून त्यांच्या कडे असलेल्या कारला ते नेहमी वेगवेगळे नंबर प्लेट लावून फिरतात. माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना पथक निर्माण करुन सदर आरोपींच्या शोधकामी रवाना केले होते.

READ ALSO

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

एलसीबीच्या पथकाने संशयीत आरोपीतांपैकी सागर लक्ष्मण देवरे, आकाश सुभाष निकम, अमोल सुरेश चव्हाण आणि महेंद्र ज्ञानेश्वर बोरसे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, जितेंद्र गोकुळ पाटील, अमोल गोकुळ पाटील, पवन ऊर्फ पप्पु सुभा पाटील, सागर लक्ष्मण देवरे, आकाश सुभाष निकम, महेंद्र ज्ञानेश्व बोरसे यांच्यासोबत मिळून मागील २-३ वर्षांपासून कधी तिन जण कधी चार जण, तर कधी पाच जण असे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर, क्रेटा, तसेच आर्टिका कारचा वापर करुन त्यांना वेगवेगळ्या पासिंगच्या नंबरच्या नंबरप्लेट लावून जळगाव जिल्हामध्ये विशेषत जळगाव शहर, भुसावळ व चाळीसगाव येथे तसेच औरंगाबाद, नाशिक, पुणे जिल्ह्यामध्ये भरदिवसा विशेषत अपार्टमेंटमध्ये प्रवेश करुन बंद असलेल्या घराचे कुलूप त्यांच्याकडील हत्याराने तोडून अनेक घरफोडी केलेल्या असल्याची अशी कबुली दिली.

३ लाखांच्या रोकडसह दागिने आणि चोरीसाठी लागणारे हत्यार जप्त !
आरोपींचे ताब्यातुन ३ लाखाची रोख रक्कम, चांदि दागिने, तसेच घरफोडी करण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे हत्यारे, एक गावठी कट्टा व चारचाकी वाहनांच्या वेगवेगळ्या पासिंगच्या २४ नंबरप्लेट असे साहित्य मिळून आले आहेत. तसेच घरफोडीत मिळालेले सोन्याचे दागिने विकण्यासाठी त्यांना अमोल सुरेश चव्हाण याने मदत केलेली असून सदरचे दागिन्यांपैकी काही दागिने अमोल चव्हाण याने वेळोवेळी त्याच्या ओळखीचे योगेश हनुमंत मोरे, (लक्ष्मी ज्वेलर्स) जोशीपेठ, जळगाव तसेच संकेत शशिकांत देशमुख, (स्वस्तीक ज्वेलर्स) जोशीपेठ, जळगाव यांना विकलेले असून दोघं सराफांनी सदरचे दागिने चोरीचे असल्याचे माहित असूनही त्यांनी ते कमी किंमतीत विकत घेतले होते.

तीन संशयित फरार !
संशयित आरोपीतांपैकी जितेंद्र गोकुळ पाटील, अमोल गोकुळ पाटील आणि पवन ऊर्फ पप्पु सुभाष पाटील हे वाहनांसह फरार झालेले असून त्यांच्याकडून अजून बरेच गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. या आरोपींच्या शोधार्थ एलसीबीचे पथक रवाना झाले आहे. तर हे आरोपी पकडले गेल्यास चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या अजुनही काही सोनारांचे नावे समोर येऊ शकतात. सदर आरोपीतांकडून जळगाव जिल्हयातील तब्बल ३१ घरफोडीचे गुन्हे उघड झालेले आहेत. तसेच नाशिक, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यात सुध्दा वेगवेगळ्या ठिकाणी याच प्रकारच्या घर फोडी चोरी केल्याची आरोपीतांनी कबुली दिलेली आहे.

यांनी केली कारवाई !
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्या पथकातील पोउनि गणेश वाघमारे, पोउनि अमोल देवढे, सफी युनुस शेख, रवि नरवाडे, अनिल जाधव, पोह राजेश मेंढे, संजय हिवरकर, सुनिल दामोदरे, संदिप पाटील, अशरफ शेख, गोरख बागुल, कमलाकर बागुल, जयंत चौधरी, अनिल देशमुख, अक्रम शेख, संदिप सावळे, लक्ष्मण पाटील, दिपक पाटील, पोना संतोष मायकल, प्रितम पाटील, प्रविण मांडोळे, रणजीत जाधव, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल बैसाणे, परेश महाजन, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, महेश पाटील, लोकेश माळी, पोह भरत पाटील, प्रमोद ठाकुर, मोतीलाल चौधरी (सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) तसेच पो.ना. करुणासागर अशोक जाधव (नेम. पोलीस मुख्यालय, जळगाव) अशांनी सदची कारवाई केली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
Next Post

अमळनेरातील कुख्यात गुन्हेगार रफिक उर्फ काजल शेख स्थानबद्ध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबाद माळी पंच मंडळाच्या अध्यक्षपदी सुनिल महाजन यांची बिनविरोध निवड ! 

August 3, 2022

‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस ; हवामान विभागाचा अलर्ट !

May 2, 2022

अनाथ बालकांच्या अत्याचाराबाबत चाईल्ड हेल्पलाईनशी संपर्क साधण्याचे आवाहन

May 11, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 09 जून ते शनिवार 15 जून 2024 !

June 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group