नाशिक (वृत्तसंस्था) : इगतपुरी येथील मंतिमंद विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेत उलट्याहून दोन मतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अन्नातून किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांचा आहे. तर इतर चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना इगतपुरीच्या उपजिल्हा रूग्णालयात हलवण्यात आलं आहे. या घटनेमुळे इगतपुरीसह जिल्ह्याभरात खळबळ उडाली आहे. अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
चारही मूल अनुसूयातमजा मतिमंद आश्रम शाळेतील आहेत. या शाळेत १२० विशेष मूल शिक्षण घेत आहेत. १२० मुलांपैकी चार मुलांना काल मंगळवारी रात्री जुलाब आणि उलटी होऊ लागल्याने त्यांना इगतपुरी इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मात्र उपचारादरम्यान हर्षल गणेश भोयेर राहाणारा भिवंडी, मोहमद जुबेर शेख (वय 8) वर्ष यांचा मृत्यू झालाय. तर आगतराव बुरुंगे (वय 17)आणि प्रथमेश बुवा (वय 15) यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्ण उपचार सुरू आहेत. चारही मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.