जळगाव (प्रतिनिधी) मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ताब्यावरून जुन-२०१८ मध्ये पाटील व भोईटे गटामध्ये तुफान हाणामारी व दगडफेक झाली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाच वर्षापूर्वीच्या याच गुन्ह्यात आज दुपारी संजय भास्कर पाटील यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
जिल्हापेठ पोलीस स्टेशन गु.र.नं. ९७/२०१८ भादंवि क, ३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ सह महाराष्ट्र पोलीस कायदा क.३७(१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे दि. १९ जून २०१८ रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्हयांत संशयित आरोपी १) पियूष नरेंद्र पाटील, २) संजय भास्कर पाटील (दोन्ही रा. दिक्षीत वाड़ी, जळगाव), ३) बालू चव्हाण (रा. कानळदा ता. जि. जळगाव), ४) भुषण पाटील (रा. माहित नाही), ५) चंद्रकांत निनाबराव पाटील (रा.माहित नाही) हे गुन्हयांत अटक नव्हते.
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेत पाटील गटाने तत्कालिन तहसीलदार निकम यांनी दिलेल्या आदेशावरून संस्थेतील कार्यालयातील ताबा घेत कामकाज सुरू होते होते. यावर भोईटे गटाने आक्षेप घेतला होता. यातूनच दोन्ही गटामध्ये १९ जून २०१८ रोजी नुतन मराठा महाविद्यालयासमोर मोठा राडा झाला होता. या प्रकरणी सुनिल धोंडू भोईट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकुण १७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या १७ आरोपींपैकी १२ जणांना अटक करण्यात आली होती. तर पियुष नरेंद्र पाटील आणि भूषण पाटील हे घटनेच्या दिवशी बाहेरगावी असल्याने त्यांची नावे गुन्ह्यातून वगळण्यात आली होती.
सदर गुन्हयांत पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.गावीत, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सदर गुन्हयांतील आरोपीतांचा शोध घेवून त्यांना अटक करण्याबाबत सुचना केल्या होत्या. त्याप्रमाणे पो.नि. किसन नजनपाटील आरोपीतांची माहिती काढली असता संशयित आरोपी संजय भास्कर पाटील हा जळगावमध्ये असल्याचे माहिती मिळाली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अनिल जाधव, रवि नरवाडे, पोहेकॉ /संजय हिरवरकर, विजयसिंग पाटील, राजेश मंडे, गोरख बागुल, अक्रम शेख, पोना / संतोष मायकल, विजय पाटील, पोका /सचिन महाजन, ईश्वर पाटील म.पोहेकॉ / रत्ना मराठे, अभिलाषा मनोरे, म.पोना/वैशाली सोनवणे, ज्योती पाटील यांचे पथक तयार करून व जिल्हापेठ पो.स्टे. सहा.पो.निरी. किशोर पवार, पोहेकॉ सलीम तडवी, पोहेकॉ गणेश पाटील, पोना/विकास पोहरकर, पोना/युनूस तडवी, पोकों / समाधान पाटील यांच्या पथकाने संजय भास्कर पाटील राहत्या घरातून ताब्यात घेत जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल गु.र.नं. ९७/२०१८ भादंवि क. ३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ सह महाराष्ट्र पोलीस कायदा क.३०७०(१४३) चे उल्लंघन १३५ या गुन्हयांत अटक केली. अटकेची कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हापेठ पोलीस स्टेशन अशांनी संयुक्तरित्या केली आहे.