TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : जळगाव राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी संजय पवार यांची नियुक्ती !

जळगाव जिल्ह्यात ४० वर्षांनी पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2023
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे संजय पवार यांची जळगाव राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना आज नियुक्तीचे पत्र देण्यात आले. दरम्यान, आजच्या या घटनेचे विशेष महत्व म्हणजे ४० वर्षापूर्वी संजय पवार यांचे वडील स्व. माजी आमदार मुरलीधर आण्णा पवार यांच्यावर देखील शरद पवार यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती.

जिल्हाबँकेचे चेअरमन तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे संजय पवार यांची जळगाव राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना आज नियुक्तीचे पत्र देण्यात आले. तर जळगाव शहर महानगर अध्यक्षपदी अभिषेक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी मंत्री धनंजय मुंडे, अनिल पाटील, भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

जळगाव जिल्ह्यात ४० वर्षांनी पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती !

शरद पवार यांनी १९८५ या वर्षी स्व. माजी आमदार मुरलीधर आण्णा पवार यांच्यावर पक्षाची जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. तर २०२३ मध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुरलीधर अण्णांचे चिरंजीव तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांची जळगांव जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. यानिमित्ताने जळगाव जिल्ह्यात ४० वर्षांनी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झालीय, असेच चित्र निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी खूप जोरात घडत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडलेले आहेत. एक गट शरद पवारांचा व दुसरा गट अजितदादा पवारांचा. कालच ना.अजितदादा पवार हे जळगाव जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात येऊन गेले. त्यानंतर त्यांनी आज लगेचच मुंबई येथे संजय पवार यांना बोलावून घेत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी जबाबदारी सोपवली. यावेळी जळगाव शहर महानगर महानगर अध्यक्षपदी अभिषेक पाटील यांची निवड करण्यात आली.

विशेष म्हणजे असा योगायोग 1985 साली देखील झाला होता. त्यावेळी शरद पवार साहेबांनी समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती आणि त्यावेळी समाजवादी काँग्रेस पक्षाची धुरा ही स्वर्गीय मुरलीधरअण्णा पवार यांच्याकडे सोपवली होती. त्यावेळी स्व. मुरलीधरअण्णा पवार यांनी यांनी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात शरद पवार साहेबांच्या सोबत संघटन बांधण्यात खूप परिश्रम घेऊन संघटन बांधणी यशस्वीरित्या पूर्ण केली होती आणि जवळपास सात आमदार शरद पवार साहेबांच्या पाठीशी उभे केले होते. तसाच काहीसा प्रकार शरद पवार साहेब व अजितदादा पवार या दोन्ही गटांमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये राजकीय घटना घडत आहे.
ज्यावेळी मुरलीधर अण्णांनी संघटना सांभाळली होती. तर आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत संजय पवार हे ही जबाबदारी सांभाळणार आहेत. एकूणच सहकार क्षेत्रामध्ये असलेली पकड व संघटन जोडणीमध्ये असलेली क्षमता याचा विचार करता पक्षाने संजय पवार यांच्यावर ही जबाबदारी टाकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संजय पवार यांना आज पत्र देण्यात आले.
या प्रसंगी मंत्री अनिल पाटील, धनंजय मुंडे, आमदार विक्रमजी काळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरजजी चव्हाण, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गरजे, उमेश नेमाडे, रवींद्रनाना पाटील, माजी युवक अध्यक्ष सुनील पाटील, डॉ. पी.एस. पाटील, गौरव लवंगे हे उपस्थित होते. या निवडीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांनी अभिनंदन केले आहे.

 

जिल्हाध्यक्ष पद शोभेचे पद म्हणून ठेवणार नाही. घराघरात राष्ट्रवादीचा विचार पोहचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल. खरं म्हणजे आज माझ्यासाठी खूप भावनिक दिवस आहे. माझ्या वडिलानंतर पुन्हा एकदा बारामतीच्या पवार परिवाराने चांदसरच्या पवार परिवारावर विश्वास दाखवला आहे. पक्षाचा विश्वास पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात सार्थ ठरविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल – संजय पवार (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी, अजित पवार गट )

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
Next Post

धक्कादायक : १३ वर्षीय मुलाकडून १० वर्षीय बालकासोबत अनैसर्गिक कृत्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडीलांना कोरोनाची लागण ; उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल

April 21, 2021

बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित ; तीन टप्प्यात होणार मतदान

September 25, 2020

धरणगावात शिंदे गटाकडून पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन

October 10, 2022

धरणगावच्या चिंतामणी मोरया परिसरात वृक्षारोपण !

June 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group