चाळीसगाव (प्रतिनिधी) पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात एक लाख स्विकारणाऱ्या मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक योगेश ढीकले यांना आज लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, तक्रारदार यांच्या विरुद्ध मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.0071/2022 भादवि कलम-115, 118 व 120 ब प्रमाणे दि. २९ मार्च २०२२ रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याच्या कागदपत्रांमध्ये मदत करून चार्जशीट लवकरात लवकर पाठवुन गुन्ह्यात मदत करण्याच्या व सदर गुन्ह्यात पोसीस स्टेशनला दिलेली हजेरी माफ करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे मेहुणबारे पोलीस स्टेशनचे गणेश जगन्नाथ ढिकले (वय ३२) यांनी पंचासमक्ष प्रथम 4,50,000 रुपये व तडजोडीअंती 1,00,000 रुपये लाचेची मागणी केली व सदर लाचेची रक्कम गणेश ढिकले यांनी स्वतः वर मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे पंचासमक्ष स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, एन.एस.न्याहळदे, पोलीस उप अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली अँन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उपाधीक्षक शशिकांत एस.पाटील, PI.संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी केली.