अहमदाबाद (वृत्तसंस्था) गुजरातमध्ये महावादळ बिपरजॉयने प्रचंड कहर केला आहे. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर विजेचे खांब कोसळले आहेत. थोडक्यात बिपरजॉयमुळे गुजरातमध्ये हाहा:कार उडालेला आहे. या वादळामुळे मेहसाणा, दाहोद, खंभात आणि भावनगरमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला.
रस्त्यावर प्रचंड पाणी भरले आहे. वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. द्वारकातही प्रचंड वेगाने वारे वाहत असून प्रचंड पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जागोजागी वृक्ष, विजेचे खांब आणि होर्डिंग्ज कोसळल्या आहेत. बिपरजॉय वादळ गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजता गुजरातच्या कच्छ-सौराष्ट्रला धडकले. रात्री राजस्थानच्या बारमेरमध्ये आकाशाला भिडले आणि एन्ट्री घेतली. वादळामुळे मेहसाणा, दाहोद, खंभात आणि भावनगरमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने दिले आहे.
तर अरबी समुद्रातून उठलेले चक्रीवादळ बिपरजॉय गुजरातच्या 940 गावांमधून ताशी 13 किमी वेगाने राजस्थानकडे सरकत आहे. राज्याला बिपरजॉय वादळाचा तडाखा बसणार असल्याचा अंदाज 6 जून रोजी वर्तवण्यात आला होता. त्यानंतर लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. 74 हजार लोकांना लोकांची शेल्टरमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे आज आणि उद्या गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. गुजरातशिवाय आणखी चार राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येणार आहे. पुढील चार दिवस राजस्थान, पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.