
धरणगाव प्रतिनिधी । आज भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुकाच्या वतीने भाजप कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री या दोघा महापुरुषांच्या प्रतिमेस माल्यार्पण व अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.
त्यावेळी भाजपचे जेष्ठ नेते शिरीष आप्पा बयस, प्रकाश सोनवणे, पुनीलाल महाजन, शेखर पाटील, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, ललित येवले, गुलाब मराठे, सुनील चौधरी, कन्हैया रायपूरकर, राजू महाजन, युवा मोर्चा अध्यक्ष भूषण धनगर, आनंद वाजपेयी, हितेश पटेल, विक्की महाजन, कृष्णा महाजन, रवी पाटील, इत्यादी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.















