TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आसाममधील भाजप सरकार अडचणीत, मेवानींचा जामीन मंजूर ; सत्र न्यायालयाची थेट उच्च न्यायालयाकडं तक्रार

The Clear News Desk by The Clear News Desk
April 30, 2022
in कोर्ट, राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

गुवाहाटी (वृत्तसंस्था) आता आसाममधील भाजप (BJP) सरकार अडचणीत आलं आहे. मेवानी यांना जामीन मंजूर करताना त्यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचा ठपका सत्र न्यायालयानं ठेवला आहे. या प्रकरणी थेट उच्च न्यायालयाकडं तक्रार दाखल करण्याची भूमिका सत्र न्यायालयानं घेतली आहे. (Jignesh Mevani News Updates)

मेवानी यांना जामीन देताना सत्र न्यायालयानं राज्य सरकारलाच अडचणीत आणलं आहे. न्यायाधीस अपारेश चक्रवर्ती यांनी म्हटलं आहे की, मेवानी यांच्यावरील कारवाई पाहता आपण देशात एक नवीन फौजदारी न्यायव्यवस्था आणत आहोत, असं दिसत आहे. मेवानी यांच्या विरोधात दाखल एफआयआरपेक्षा संबंधित महिलेनं न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेला जबाब वेगळा आहे. महिलेचा जबाब पाहता हा खोटा गुन्हा तयार करण्यात आल्याचे दिसते. जिग्नेश मेवानी यांना दीर्घ काळ तुरूंगात ठेवण्यासाठी न्यायालय आणि कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर झालेला आहे.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

अशा प्रकारच्या खोट्या एफआयआर दाखल करून पोलीस त्यांची विश्वासार्हता गमावत आहेत. आरोपींवर गोळीबार अथवा त्यांची हत्या करणे हे पोलिसांसाठी राज्यात नेहमीचे काम झाले आहे. यामुळे सत्र न्यायालयानेच या प्रकरणी उच्च न्यायालयाकडे तक्रार केली आहे. उच्च न्यायालयच आता आसाम पोलिसांना निर्देश देईल. यामुळे पोलिसांच्या कामात सुधारणा होईल. आरोपीला अटक करताना प्रत्येक पोलिसाला बॉडीकॅम आणि वाहनांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या उपाययोजना करता येतील. अन्यथा हे राज्य पोलिसांचे राज्य बनेल आणि ते समाजाला परवडणारे नाही, असेही न्यायालयाने सांगितले.

भाजपने मला अडकवण्यासाठी महिलेचा वापर केला – मेवानी यांचा दावा

भाजपने मला अडकवण्यासाठी महिलेचा वापर केल्याचा दावा मेवानी यांनी केला आहे. हा भाजप सरकारचा भ्याडपणा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आसाममध्ये भाजपची सत्ता आहे. दरम्यान, मेवानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आसाम पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर लगेचच आसाम पोलिसांनी त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली होती. महिला पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन केल्याप्रकरणी हा दुसरा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला होता. या प्रकरणी अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.

काय आहे प्रकरण ?

वडगावमधील पालनपूर सर्किट हाऊसमध्ये मेवानी यांना 21 एप्रिलला आसाम पोलिसांनी अटक केली होती. त्या रात्रीच त्यांना अहमदाबादमध्ये नेण्यात आले होते. तिथून रेल्वेने त्यांना आसाममध्ये गुवाहाटीला नेण्यात आले होते. आसाममधील कोक्राझार येथील स्थानिक भाजप (BJP) नेत्यानं मेवानी यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली होती. धार्मिक भावना दुखावना, धार्मिक तेढ निर्माण करणे, असे आरोप मेवानी यांच्यावर करण्यात आले होते. आसाममध्ये पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर 24 तासांतच मेवानी यांना अटक झाली होती. गुजरातची आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही कारवाई झाल्याचा दावा काँग्रेसनं केला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
कोर्ट

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

March 10, 2026
Next Post

अमित ठाकरेंचं पोलिसांना थेट आव्हान ; म्हणाले, आम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावच्या चौधरी कुटूंबाला ठाकरे परिवाराकडून निष्ठेची भेट

October 3, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, गुरूवार ८ जून २०२३ !

June 8, 2023

मुक्ताईनगर तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा ; गारपिटीने ५६३ हेक्टरवर पिके उद्ध्वस्त !

April 11, 2023

खळबळजनक : शिवसेना महिला नेत्याचा चाकूने भोसकून निर्घृण खून ; धक्कादायक कारण आले समोर !

September 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group