केरळ (वृत्तसंस्था) “भाजप हा सांप्रदायिक पक्ष नाही. हा देशावर प्रेम करणाऱ्या लोकांचा पक्ष आहे. केरळमध्ये हिंदू, ख्रिस्ती मुलींना भुरळ घालण्याचे प्रयत्न करत आहे. ज्यालाच भाजप लव्ह जिहाद असं म्हणत आहे,” असं ‘मेट्रोमॅन’ अशी ओळख असलेल्या आणि लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असलेल्या ई. श्रीधरन यांनी म्हटले आहे.
ही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलेली प्रशंसा नाही, तर भाजपची मूल्यं आहेत. ज्यांनी त्यांना पक्षात सामील होण्यासाठी प्रेरित केलं, “मी माझ्या जबाबदारींमध्ये व्यस्त होतो. आता मी समाज आणि विशेषत: आपलं राज्य केरळ यासाठी काहीतरी करू इच्छित आहे. हेच राजकारणात प्रवेश करण्याचं कारण आहे. गेल्या १५-२० वर्षात देशात युडीएफ, एलडीएफचं सरकार होतं. परंतु राज्यात मोठा कोणताही बदल दिसला नाही. २० वर्षांत केरळमध्ये एकही उद्योग आला नाही. भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे,” असं श्रीधरन यांनी राजकारणातील प्रवेशाबाबत सांगितलं. भले केरळमध्ये भाजपचा एकच आमदार आहे, तरी मी पक्षाची प्रतीमा बदलण्यासाठी आणि पक्ष पुढे नेण्यासाठी भाजपशी जोडलो गेलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याशीदेखील आपले उत्तम संबंध होते. देशाच्या प्रती प्रेम आणि देशाच्या हितासाठी सेवा करण्याची भावना भाजपमध्ये असल्याचंही श्रीधरन यांनी नमूद केलं.
















