औरंगाबाद (वृत्तसंस्था) भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या बंगल्याचं वीज कनेक्शन कापल्यानं ते चांगलेच भडकलेत. भडकलेल्या लोणीकरांनी महावितरण अभियंता दादासाहेब काळे यांना फोन करून धमकावलं. तसंच शिवीगाळही केली. ही ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे.
काय धमकी दिली आहे बबनराव लोणीकर यांनी
महावितरण अभियंता दादासाहेब काळे यांना फोन करुन धमकी दिल्याची ही ऑडिओ क्लिप आहे. यात लोणीकर म्हणतायत, अरे XXXX आम्ही बील भरतो, मी दहा लाख रुपये बील भरलं आहे औरंगाबादचं. तुमच्यात हिंमत आहे तर झोपडपट्टीत जा, जे आकडे टाकतात त्यांच्याकडे जा, आम्ही पैसे भरतो. दोन मीटरचे दहा लाख भरले आहेत, मी या वर्षात एका मिनिटात मी तुला घरी पाठवेन, माज चढला का, आम्ही पैसे भरतो, जी छोटी लोकं आहेत ते लोकं तुम्हाला मटण तोडायच्या सत्तूरने तोडतील, नीट वागा, काचेची बांगडी आहे, घोडे लावू शकतो, सस्पेंड करु शकतो, तुम्हाला नीट करु शकतो,
तुमच्या XXXX लोकांनी काढून नेलं आहे माझं मीटर, आयकर विभागाच्या धाडी टाकेन, काय प्रॉपर्टी घेतली, कुठे कुठे पैसे घेतले, आम्ही कुंडल्या ठेवल्यात तुमच्या आमच्या नादी लागू नका. आम्ही जिथे राहतो तिथे ५० टक्के आकडे आहेत, त्यांच्याकडे जाण्याची तुमची हिम्मत नाहीए. उर्जामंत्रीसुद्धा माझ्या जवळचे नातवाईक आहेत, उद्या एक कम्पेंट टाकली ना नोकरी जाईल, असं संभाषण या कथित ऑडिओ क्लिपमध्ये आहे.
बबनराव लोणीकर यांचं स्पष्टीकरण
दरम्यान, हा मला बदनाम करण्याचा कट असून माझी व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप खोटी असल्याचा दावा परतुरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलाय, माझं मीटर शाबूत आहे कुणीही कापले नाही, हा मला बदनाम करण्याचा कट असल्याचं लोणीकर यांचं म्हणणं आहे.