मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. लाड यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करून दिली आहे.
भाजप आमदार प्रसाद लाड याना रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधोपचार सुरू असल्याची माहिती देखील प्रसाद लाड यांनी स्वत: दिली आहे. ‘माझी कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे.डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेत आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझी विनंती आहे, स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी. असे आव्हान नागरिकांना केलं आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण्यांच्या संख्येत बऱ्यापैकी घट झाली होती. पण काल (18 नोव्हेंबर) राज्यात कोरोनाचे तब्बल ५ हजार ११ नवे रुग्ण आढळले होते. त्यामुळे चिंता वाढली आहे. राज्य सरकारने पुढच्या काही दिवसात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेणं जरुरीचं आहे. राज्यात अजूनही ८० हजार पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु आहे.