मुंबई (वृत्तसंस्था) दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने शिवतीर्थावर आणि शिंदे गटाने बीकेसीच्या मैदानावर तयारी केली आहे. परंतू मेळाव्यासाठी भाजपच्या आणि मनसेच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याची माहिती शिंदे गटाच्या नेत्यांकडून मिळाली आहे.
दसरा मेळाव्यासाठी भाजपच्या आणि मनसेच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याची माहिती शिंदे गटाच्या नेत्यांकडून मिळाली आहे. मेळाव्यासाठी फक्त शिवेसनेचे नेते, दसरा मेळावा फक्त शिवेसनेचा आणि हीच खरी शिवसेना हे सिद्ध करण्यासाठी शिंदे गटाने ही खेळी खेळल्याचं सांगण्यात येत आहे. तर दोन्ही गटाकडून मेळाव्याचे टीझर लाँच करण्यात आले आहेत. शिवसेनेकडून पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे पार पडत असून त्याकडे सर्वांच्या नजरा असतील. तर हा मेळावा येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी दोन्ही गटांसाठी महत्त्वपूर्ण ठरतील का हे पाहावे लागणार आहे. शिंदे गटाकडून मेळाव्यासाठी निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध केली असून हिंदवी तोफ बंधमुक्त होऊन पुन्हा धडाडणार असा उल्लेख करत शिवसैनिकांना शिंदे गटाकडून अवाहन करण्यात आले आहे.