नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एका पोलीस ठाण्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये काही अर्धनग्न लोक पोलीस ठाण्यात उभे असून हे युट्यूब पत्रकार आहेत. दरम्यान, नीरज कुंदर (Neeraj Kundar) नावाच्या थिएटर कलाकाराने (Theatre Artist) भाजप आमदार केदारनाथ शुक्ला (BJP MLA kedarnath Shukla) आणि त्यांचा मुलगा गुरू दत्त विरोधात अवमानजनक टिपण्णी केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार एका नकली अकाऊंटच्या माध्यमातून टिपण्णी केली होती. तर हा प्रकार 2 एप्रिल रोजी घडला असून गुरूवारी फोटो व्हायरल झाल्यामुळे हा संतापजनक प्रकार चर्चेत आला. या प्रकारावर कोतवाली पोलिस स्टेशनचे इनचार्ज मुकेश सोनी यांनी सांगितले की, नीरज कुंदर यांनी नकली फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून अनेकदा अवमानजनक टिपण्णी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मात्र नीरज कुंदर या थिएटर कलाकाराला अटक केल्यानंतर कनिष्क तिवारी नावाच्या युट्यूब पत्रकारासह काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी कलाकाराच्या अटकेविरोधात पोलिस ठाण्यात घोषणाबाजी केली. तसेच पोलिस आणि राज्य सरकारवर टीका केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र पोलिसांनी युट्यूब पत्रकारासह आठ जणांचे कपडे काढून त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर या सर्वांचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच या प्रकाराबद्दल सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पत्रकार असतानाही बातमी चालवली, हे महापाप – रणविजय सिंह
पत्रकार रणविजय सिंह यांनी या प्रकरणावर ट्वीट करत दावा केला आहे की, हे मध्यप्रदेशातील यु-ट्यूब पत्रकार आहेत. त्यांनी भाजप आमदाराच्या विरोधात बातमी चालवली. त्याबद्दल पोलिसांनी त्यांचे कपडे काढून नग्नावस्थेत उभे केले. तर त्यानंतर रणविजय सिंह यांनी आणखी एक ट्वीट करत म्हटले आहे की, या पत्रकारांचा गुन्हा मोठा आहे. सर्वात मोठा गुन्हा आहे. कारण त्यांनी पत्रकार असतानाही बातमी चालवली. हे महापाप आहे. परंतू तरीही त्यांना थोडासा दिलासा देण्याची मागणी करून मुर्खपणा करत आहे. त्यांच्यावर कृपा करावी. त्यांच्या घरावर बुलडोजर चालवून यांना सोडून देण्यात यावं, ही मोठी कृपा होईल, असे रणविजय सिंह यांनी म्हटले आहे.