जळगाव (प्रतिनिधी) ओबीसी आरक्षणास जबाबदार राज्य सरकारच्या निषेधार्थ दि. २६ जून रोजी भाजपातर्फे राज्यभर १००० ठिकाणी होणाऱ्या ‘चक्काजाम आंदोलन’ची माहिती खासदार रक्षाताई खडसे व जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपा प्रदेश कार्यकारणीची महत्वपूर्ण बैठक आज मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती, सदर बैठकीत राज्याचे आगामी होणारे अधिवेशन तसेच राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे रद्द करण्यात आलेले राजकीय आरक्षण संदर्भात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मार्गदर्शन केले. सदर बैठकीस खासदार रक्षाताई खडसे जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधींसह व्हिडियो कॉन्फरन्सिंग द्वारे जळगाव येथे उपस्थित होत्या. सदर बैठकीनंतर खासदार रक्षाताई खडसे व जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दि. २६ जून रोजी भाजपातर्फे राज्यभर १००० ठिकाणी होणाऱ्या ‘चक्काजाम आंदोलन’ विषयी पत्रकारांना माहिती दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांत ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी भाजपा महाराष्ट्रतर्फे दि. २६ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येऊन याला जबाबदार राज्य सरकारलाचा निषेध करण्यात येणार आहे. ओबीसींना परत आरक्षण मिळणेसाठी न्यायालयात पण जाऊ तसेच आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत निवडनुका होऊ देणार नाही अशी भूमिका यावेळी घेण्यात आली. यावेळी ओबीसी समाजास पुन्हा राजकीय आरक्षण मिळणे संदर्भात करण्यात येणाऱ्या चक्काजाम आंदोलना विषयी खासदार रक्षाताई खडसे व जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांचे कडून प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ओबीसी समाजासाठी सर्व समाजातील व्यक्तींनी एकत्र येऊन चक्काजाम आंदोलनात सहभागी होऊन ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी कार्यसमितीची बैठक व पत्रकार परिषद मध्ये खासदार रक्षाताई खडसे, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे, जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील, डॉ. राजेंद्रजी फडके, किशोर काळकर, संघटनमंत्री रविजी अनासपुरे, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिताताई वाघ, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी जि.प.अध्यक्ष अशोक कांडेलकर, पोपटतात्या भोळे, जिल्हाउपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पद्माकर महाजन, हर्शल पाटील यांच्यासह सर्व भाजपा तालुकाध्यक्ष, महिला आघाडी अध्यक्षा तसेच जळगांव जिल्ह्यातील सर्व भाजपा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.