बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील धोंडखेडा येथील रोशन सुभाष पाटील (वय २२) या तरुणाने आज सायंकाळी पाच ते साडेपाच चे दरम्यान शेतात गळफास घेवुन आत्महत्या केली.
सुभाष पाटील हा तरुण जळगाव जामोद येथे पशुधन पर्यवेक्षकचे शिक्षण घेत होता. याबाबत भागवत जवानसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरुन आकस्मिक मृत्युची नोद करण्यात आली असून पुढील तपास पो.कॉ. ऊद्धल चव्हाण हे करीत आहेत.