धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मोठा माळी वाडा परिसरात भरदिवसा धाडसी चोरी झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
या संदर्भात अधिक असे की, तुळजाबाई पुनमचंद माळी (वय ८४ वर्षे) ह्या मोठा माळी वाडा परिसरात वस्त्यावास आहेत. दि. २ जून रोजी दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान, तुळजाबाई ह्या गल्लीतील एका कार्यक्रमात गेल्या होत्या. याच वेळेत अज्ञात चोरट्यांनी घरातील बाथरूमच्या वर ठेवलेल्या लोखंडी पेटीचे कुलूप तोडून त्यातील ४५,००० हजार रुपये किंमतीची १८ ग्रम वजनाची सोन्याची चैन, २० हजार रुपये किंमतीची ८ ग्रम वजनाची सोन्याची गोळी, असा एकूण ६५ हजाराचा सोन्याचे दागिने व पावत्या चोरून नेल्या.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकास पाचरण करण्यात आले. परंतू चोरट्याचा कुठलाही माग निघू शकला नाही. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. उद्धव ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. उमेश पाटील हे करीत आहे. महितील व्यक्तीनेच चोरी केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, भरदिवसा चोरी झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.