जालना (वृत्तसंस्था) शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. अभिजित भारत येडे (१७), अर्चना संजय भालेराव (१५, दोघे रा. तळेगाव) अशी मयतांची नावे आहेत.
घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथे गुरुवारी दुपारी ही घटना घडल्यानंतर शुक्रवारी सकाळी दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. अभिजित व अर्चना हे शेजारीच राहतात. गुरुवारी ते शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले. दुपारी त्यांच्या शेळ्या गावातीलच एका शेतकऱ्याच्या शेतातील पीक खात होत्या. त्यावेळी दोघांचा शोध घेतला तेव्हा ते दिसले नाहीत. दोघांचा शोध घेतला तेव्हा ते दिसले नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विचारपूस केली. रात्री आठ वाजेच्या सुमारास तळेगाव येथील तलावात अभिजित येडे याच्या चपला तरंगताना दिसल्या. शिवाय त्याच ठिकाणी पाणी पिण्याची बॉटल दिसून आली.
काही बरेवाईट झाले नसेल ना या शंकेने गुरुवारी सकाळी नातेवाईकांनी गळ टाकून पाहिला असता, अभिजित येडे याचा मृतदेह बाहेर आला. नंतर काही वेळाने अर्चना भालेराव हिचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला. गुरुवारी सकाळी नातेवाईकांनी गळ टाकून पाहिला असता, अभिजित येडे याचा मृतदेह बाहेर आला. नंतर काही वेळाने अर्चना भालेराव हिचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला. अभिजीत येडे हा दहावीत होता. घरी असलेल्या बकऱ्या चारण्यासाठी तोच घेऊन जायचा. त्याच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. अर्चना भालेराव ही सातवीत शिक्षण घेत होती. तिच्या घरी असलेल्या शेळ्या तीच नित्य नियमाने चारण्यासाठी घेऊन जायची.