अमळनेर (प्रतिनिधी) येथील ढेकू रोडवरील आर्यन टर्फ येथे कुसुमाई बिजनेस ग्रुपच्या वतीने भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील स्पर्धा हि दि. ३१ जुलै व १ ऑगस्ट या दोन दिवसीय स्पर्धा भरविण्यात आली.
सदरील स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १५,००० रुपये सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ खंडारे यांच्या कडून देण्यात आले तसेच द्वितीय पारितोषिक ११,००० रुपये दादा पवार (माजी नगरसेवक) यांच्या कडून देण्यात आले. सदरील स्पर्धेसाठी कुसुमाई फर्निचर, कुसुमाई सुंगधालय, श्रीमान अमृततुल्य, न्यू सुयोग मेडिकल, ओम साई कॉम्प्युटर्स, स्वराज्य मेडिकल, पी.एम फोटोग्राफी, भारती इंटरप्राइजेस आदींनी कॉ. स्पॉन्सरशीप दिली. स्पर्धेचे आयोजन आकाश पवार, अभिषेक पाटील, प्रफुल्ल संदानशिव, प्रशांत मोरे, राज महाजन आदींनी केले. पंच म्हणून मंजित सोनार, भावेश जैन, महेश पाटील यांनी काम पाहिले. तसेच सूत्र संचालन निनाद शिसोदे यांनी केले. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक हे अजिंक्य ११ (नाशिक) या संघाने जिंकले तर द्वितीय पारितोषिक हे जे.जे टर्फ ११ अमळनेर यांनी जिंकले.