धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २५ वर्षीय विवाहिता घरात झोपलेली असतांना रात्री ११ वाजेच्या सुमारास रितेश राजेंद्र पाटील याने मागच्या दरवाजाने घरात प्रवेश केला. त्यानंतर पिडीतेचा डावाहात पकडून स्त्री मनास लज्जा उत्पन्न हाईल, असे कृत्य करुन विनयभंग केला. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा. पो. अधिक्षक कृषीकेश रावले हे करीत आहेत.