पारोळा (प्रतिनिधी) जिल्ह्यातील पारोळा येथील एका बनावट देशी दारूचा कारखाना उध्वस्त नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाने नष्ट केला आहे. नाशिकच्या पथकाने मध्यरात्री ही कारवाई केल्याची माहिती समोर येत असून कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी २२ हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा झाला आहे.
या ठिकाणी झाली कारवाई
निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग, नाशिक या पथकाने दि. २४ डिसेंबर रोजी मौजे पारोळा नगरपरिषद हद्यीतील धुळे- नागपुर महामार्गालगत असलेल्या गट नं. १८१ मधील प्लॉट नं.१,२ व ३ या मिळकतीमध्ये असलेल्या पत्र्याच्या गोडावूनमध्ये पारोळा शिवार, पारोळा, ता. पारोळा, जि.जळगाव या ठिकाणी छापा टाकुन बनावट मद्य तयार करणारा कारखाना उध्दवस्त केला.
हे आहे जप्त साहित्य
१) रॉकेट देशी दारु संत्रा ब्रँडचे ३७,२०० बनावट जिवंत पत्री बुचे,
२) देशी दारु दारु टँगो पंचचे ४००० बनावट जिवंत पत्री बुचे
३) रॉकेट देशी दारु संत्रा ब्रँडचे १,५५,५०० बनावट कागदी लेबल,
४) देशी दारु दारु टँगो पंचचे ६०,००० बनावट कागदी लेबल.
५) एक आर. ओ मशीन.
६) ९० मि.ली क्षमतेच्या २४, २२० रिकाम्या बाटल्या.
८०० लिटर Acetone सदृष्य द्रावण.
८) रबरी नळी, पाण्याचे माटर, २०० लिटर क्षमतेच्या २४ प्लास्टिक ड्रम स्पिरीट वासाचे,
३५० फुट लांबीची वायर,
९) प्लास्टिक ट्रे- १०० नग
१०) नऊ मोबाईल संच
जप्त वाहन आणि मुद्देमालाची किंमत
१) एक दहा चाकी टाटा कंपनीचा ट्रक परिवहन क्र. MH १८ – M – ३८३७.
२) एक सहा चाकी आयशर कंपनीचा ट्रक परिवहन क्र. MH १८-BG-९८२३.
एकूण १ कोटी ६४ लाख १६२ रुपये
संशयित आरोपींचे नावे
१) महेश संभाजी पाटील, राहणार- जवखेडे, ता. अमळनेर, जि. जळगाव, २) सुदामगिर भुरागिर गोसावी, राहणार- भाटपुरा ता. शिरपुर, जि. धुळे, ३) प्रेमसिंग रतन जाधव, राहणार – रोहिणी ता. शिरपुर, जि.धुळे ४) नरेंद्र मधुकर पाटील, मु. पो. गुढे, ता. भडगांव, जि. जळगांव, ५) राजु रतन जाधव, राहणार- मु.पो. धवली, ता. वरला, जि. बडवानी (मध्यप्रदेश), ६) प्रदिप ईस्मल पावरा, राहणार- मु. मोहिदा, पो. पळसनेर, ता. शिरपुर, जि.धुळे,७) दिपक गुलाब पावरा, राहणार- मु. दुधखेडा ता. वरला, जि. बडवानी (मध्यप्रदेश),८) रंजीत निंबा पावरा, राहणार- मु. गधाडदेव, पो. मालकात्तर ता. शिरपुर, जि. धुळे, ९) प्रताप चंदरसिंग पावरा, राहणार- मोहिदा, पो. पळसनेर ता. शिरपुर, जि. धुळे, १०) सतिष अबला पावरा, राहणार- मोहिदा, पो. पळसनेर ता. शिरपुर, जि. धुळे, ११) प्रकाश बदा पावरा, राहणार- मोहिदा, पो. पळसनेर ता. शिरपुर, जि. धुळे, १२) राकेश कंदरसिंग पावरा, राहणार- मोहिदा, पो. पळसनेर ता. शिरपुर, जि. धुळे, १३) दयाराम नहालसिंग बारेला, राहणार- मु. धवर्ला, ता. वरला, जि. बडवानी (मध्यप्रदेश),१४) रामगिर भुरागिर गोसावी, राहणार- भाटपुरा ता. शिरपुर, जि.धुळे १५) भिमसिंग बदा चव्हाण, राहणार- मु. तांडा, पो. धवर्ला, ता. वरला, जि. बडवानी (मध्यप्रदेश),१६) सुरेश श्रावण राठोड, राहणार- रोहिणी ता. शिरपुर, जि. धुळे, १७) निलेश नुरजी पावरा, राहणार- मोहिदा, पो. पळसनेर ता. शिरपुर, जि. धुळे, १८) समाधान लोचन चौधरी (मुख्य संशयीत फरार), राहणार-पारोळा, ता. पारोळा जि. जळगांव,१९) सुधाकर भास्कर पाटील (संशयीत फरार), राहणार – वर्धमान नगर, उंदीरखेडारोडा, ता. पारोळा, जि. जळगाव,२०) प्रदिप आनंदा पवार ( संशयीत फरार), राहणार- आर.एल. नगर, अमळनेर रोड, ता. पारोळा, जि. जळगाव, २१) राहुल अहिरराव, (संशयीत फरार), राहणार – मु. पो. धुळे, ता. जि. धुळे., २२) संशयित पाहिजे गुन्ह्यात जप्त वाहन क्र. MH-18-M-3837 व MH-18- BG-9823 चे मालक तसेच मद्य विकत घेणार, मद्यार्क (स्पिरीट) पुरवठादार ज्ञात-अज्ञात व गुन्ह्याशी संबधीत इतर संशयीत फरार इसम
यांनी केली कारवाई
सदरची कारवाई डॉ. विजय सुर्यवंशी (आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई), सुनिल चव्हाण, संचालक (अं. व द) महाराष्ट्र राज्य, मुंबई, अर्जुन ओहोळ (विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग)तसेच जितेंद्र गोगावले (अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव) यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाई विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक ए. एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक व्ही. एम. पाटील, अ. गो. सराफ, जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, लोकेश गायकवाड, युवराज रतवेकर, यांनी यशस्वी रित्या पार पाडली. सदरील कारवाई करिता निरीक्षक, भरारी पथक, जळगाव, सी. एच. पाटील व त्यांचा स्टाफ तसेच निरीक्षक, भरारी पथक, धुळे श्री. दिंडकर व त्यांचा स्टाफ तसेच दुय्यम निरीक्षक, धुळे ग्रामीण, धुळे पी. बी. अहिरराव व त्यांचा स्टाफ यांनी मदत केली. सदरील गुन्हयाचा पुढील तपास ए. एस. चव्हाण, निरीक्षक, विभागीय भरारी पथक नाशिक विभाग, नाशिक हे करीत आहेत.
जनतेस आवाहन
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जनतेस आवाहन करण्यात आले की, अवैद्य मद्य निर्मीती, विक्री, वाहतुक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्र.१८००२३३९९९९ व व्हॉटस अॅप क्र.८४२२००११३३ तसेच दुरध्वनी क्र. ०२५३ / २३१९७४४ वर संपर्क साधावा.
बडे राजकीय पाठबळ असण्याची शक्यता
एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट देशी दारूचा कारखाना बड्या राजकीय नेत्यांच्या पाठबळ शिवाय सुरु असू शकत नाही, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे स्थानिक पोलिसांना याबाबत कशी माहिती नव्हती, असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस तपासात काही बडी नावे समोर येणार असल्याची चर्चा आहे.