धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वाघळूद बु. येथे आपल्या चुलत भाऊचा खून करून मागील ३३ वर्षापासून फरारी असलेल्या आरोपी कैलास रूपसिंग पाटील (वय ५५) याला धरणगाव पोलिसांनी अखेर शोधूनच काढले आहे. मोठ्या शिताफीने स्थानिक पोलिसांच्या मदतीने धरणगाव पोलिसांनी त्याला नवसारीतून अटक केली आहे.
या संदर्भात अधिक असे की. साधारण ३३ वर्षापूर्वी कैलास पाटील याने आपल्या चुलत भावाचा खून केला होत. तेव्हापासूनच तो फरारी होता. कोर्ट प्रत्येक तारखेला पोलिसांना आरोपी अटक का नाही?, याची सतत विचारणा करत होते. त्यामुळे धरणगाव पोलिस मागील ३३ वर्षापासून आरोपीला अटक करण्याच्या मुद्द्यावरून मोठ्या दबावात होते. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,चोपडा भागाचे कृषीकेश रावले यांनी पो. नि.उद्धव ढमाले यांनी पदभार सांभाळल्यापासून या प्रकरणावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पो.नि. ढमाले यांनी पोहेकॉ मोती पवार आणि राजेंद्र कोळी यांना तपासाबाबत विशेष सूचना दिल्या होत्या. आरोपी कोणत्याही परिस्थितीत शोधून काढण्यासाठी पोहेकॉ मोती पवार आणि राजेंद्र कोळी हे देखील मागील एक महिन्यापासून अनेक ठिकाणी फिरत होते. त्यानंतर अखेर एका गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हा नवसारी येथे असल्याची कळाले.
पो. नि.उद्धव ढमाले यांनी पोहेकॉ मोती पवार आणि राजेंद्र कोळी यांना तात्काळ गुजरातला जाण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार दोघं कर्मचारी नवसारी येथे पोहचले. स्थानिक पोलिसांची मदत घेतल्यानंतर पोहेकॉ पवार आणि कोळी यांनी सापळा रचून त्याला अलगद ताब्यात घेतले. गुजरात मधील कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर आज रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे पथक आरोपी सोबत धरणगाव येथे पोहोचणार आहे. दरम्यान, तब्बल ३३ वर्षापासून फरार आरोपीला धरणगाव पोलिसांनी शोधून काढल्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे आरोपी फरार असल्यापासून तो गावातील आपल्या कुटुंबियांच्या देखील संपर्कात नव्हता. त्याचा कोणताही मोबाईल नंबर उपलब्ध नव्हता. तरी देखील धरणगाव पोलिसांनी आरोपीला शोधून काढले हे विशेष ! तपासकामी एपीआय जीभाऊ पाटील, पीएसआय संतोष पवार,राजेंद्र पाटील, राहुल बोरसे, जितेंद्र भदाणे, गोपनीय विभागाचे मिलिंद सोनार, विनोद संदानशिव यांनी सहकार्य केले.