धरणगाव (प्रतिनिधी) वाळू वाहतूक सुरु ठेवत डंपरवर कारवाई न करण्यासाठी २५ हजाराची लाच स्वीकारतांना नायब तहसीलदारसह कोतवालला जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली आहे.
या संदर्भात अधिक असे की, अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्या डंपरवर कारवाई न करण्यासह वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी 30 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 25 हजारांची लाच स्वीकारताना धरणगावचे नायब तहसीलदा जयंत पुंडलिक भट व कोतवाल राहुल नवल शिरोडे यांना जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. यामुळे धरणगाव महसूल विभागात लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांनी हा सापळा यशस्वी केला.