नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा आज करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्रात दिवाळीनंतर म्हणजे 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला मजमोजणी पार पडणार आहे.
महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा असून एकूण मतदार ९ कोटी ६३ लाख मतदार आहेत. यंदाच्या निवडणुकीत २९ लाख हे नव मतदार असणार आहेत. तर १ लाख १८६ पोलिंग स्टेशन असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदानाची सोय करण्यात येणार आहे. ८५ पेक्षा अधिक वय असलेल्यांना घरून मतदान करता येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करण्यासोबत आजपासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होणार असल्याचीही घोषणा केली.
असं आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळापत्रक !
निवडणुकीचं नोटिफिकेशन : 22 ऑक्टोबर 2024
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर
अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
मतदान : 20 नोव्हेंबर 2024
मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024