जळगाव (प्रतिनिधी) रेशनकार्ड जुने व जीर्ण झालेले असल्याने दुय्यम नविन प्रत देण्यासाठी जळगाव तहसील कार्यालयातील पुरवढा शाखेतील तरुणाला ४०० रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, तक्रारदार यांचे रेशनकार्ड जुने व जीर्ण झालेले असल्याने त्यांनी रेशनकार्डची दुय्यम नविन प्रत मिळणेसाठी तक्रारदार पुरवठा शाखा, तहसिल कार्यालय जळगाव येथे अर्ज घेऊन गेले. यावेळी पुरवठा शाखेमधील रुममध्ये बसलेल्या पराग पुरुषोत्तम सोनवणे (वय ३९) याने तुझे रेशनकार्डची दुय्यम प्रत तयार करून देण्याच्या मोबदल्यात सोनवणे याने पंचासमक्ष ४०० रुपये लाचेची मागणी केली. तसेच सदर लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वतः पुरवठा शाखा, तहसिल कार्यालय जळगाव येथे स्वीकारली. याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात अटक केली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, वाचक पोलीस उप अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत एस.पाटील, PI.संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी केली.