रांची (वृत्तसंस्था) एका भावाने आपल्या दोन सख्ख्या बहिणींना वासनेची शिकार बनवून ( Brother Raped Two Sisters ) आईवरही बलात्कार करण्याचा प्रयत्न ( Attempt to rape mother ) केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली ( Brother Arrested For Raping Sisters) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅरेज दुरुस्तीचे काम करणाऱ्या तरुणाने हा प्रकार केला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गॅरेजमध्ये मोटार मेकॅनिक म्हणून काम करतो. त्याच्या घरात आई-वडील आणि त्याच्या दोन बहिणी आहेत. मोठी बहीण 19 वर्षांची आहे, तर धाकटी 16 वर्षांची आहे. रिपोर्टनुसार, आरोपी गेल्या 3-4 वर्षांपासून सतत त्याच्या लहान बहिणीवर बलात्कार करत होता. बुधवारी (२७ एप्रिल २०२२) त्याची मोठी बहीण आंघोळ करून स्वयंपाकघराकडे जात असताना आरोपीने तिच्यावरही बलात्कार केला. घटनेदरम्यान मोठ्या बहिणीच्या किंकाळ्या ऐकून धाकटी बहीण खोलीत पोहोचली आणि दुष्ट भावाच्या तावडीतून तिला वाचवण्याचा प्रयत्न करू लागली. त्यानंतर आरोपीने तिला चाकू दाखवून गप्प केले. दरम्यान, मुलींचा आवाज ऐकून आरोपीची आईही तेथे पोहोचली, तेव्हा आरोपी पूर्णपणे नग्न अवस्थेत होता आणि तो आपल्याच बहिणींसोबत घाणेरडे कृत्य करत होता. त्याच्या आईने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा या विकृत मुलाने तिच्यावरही बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याने कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
दरम्यान, या घटनेमुळे दुखावलेल्या आरोपीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध महिला पोलिस ठाण्यात आयपीसी कलम 376, 354, 506 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.