जळगाव (प्रतिनिधी) मुंबईत पोलिस सशस्त्र दलात कर्तव्यावर असलेल्या 31 वर्षीय तरुणीवर लग्नाच्या आमिषाने वारंवार अत्याचार करण्यात आला. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तरुणीने एमआयडीसी पोलिसात तक्रार नोंदवल्यावरून संशयित महेंद्र ठाकूर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई पालिस दलात नोकरीमध्ये असलेल्या एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील महेंद्र ठाकूर याने 8 ते 11 जानेवारी 2024 दरम्यान वारंवार अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पीडित तरुणीने जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मंगळवार, 23 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता संशयित आरोपी महेंद्र ठाकूर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे हे करीत आहे.