पाचोरा (प्रतिनिधी) येथील बी.एस. एफ. जवानाचा मिझोराम येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि.१५ जुन रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पाचोरा शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे.
पाचोरा शहरातील देशमुखवाडी येथील चेतन प्रकाश हजारे (वय – २९ वर्ष) हे कठोर परिश्रम करून वयाच्या २२ व्या वर्षी सैन्य दलात (बी. एस. एफ.) भरती झालो होता. अत्यंत हुशार आणि चाणाक्ष असलेले चेतन सैन्य दलात अतिशय जिकरीने व मेहनतीने देशाची सेवा करत होता. चेतनला दि.१५ जुन रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चेतन गेल्या काही वर्षांपसुन पत्नी व आपल्या दोन मुलांसह कर्तव्यावर असलेल्या एझवाल (मिझोराम) सेक्टर मधील क्वार्टरमध्ये वास्तव्यास होता. चेतन हजारे हा एप्रिल २०२४ मध्ये सुट्टीवर आला होता. दि.१४ एप्रिल रोजी तो पुन्हा देशसेवा देण्यासाठी मिझोराम येथे गेला होता.













