जळगाव ( प्रतिनिधी) : जळगाव येथील अजिंठा हाउसिंग सोसायटी मध्ये १४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्ध विहारात बुद्ध वंदना व भाषणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी साहित्यिक जयसिंग वाघ होते त्यांनी आपल्या भाषणात गौतम बुद्ध यांनी सर्वप्रथम वर्णव्यवस्था , जातिव्यवस्था मोडित काढून मानव व मानवाचे कल्याण हेच आपले प्रथम व अंतिम उद्दिष्ट मानुन मानवतावादी तत्वे समाजात रुजवली , समाजात स्त्रियांना समान दर्जा बहाल केला आणि खऱ्या अर्थाने ईथूनच मानवतावादाची तत्वे रुजू झाली जी आजही साऱ्या जगाला मार्गदर्शक ठरत आहेत असे स्पष्ट केले सुरवातीस भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन चेयरमन दिलीप सपकाळे , पी. डी. सोनवणे, विजय भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले , त्यानंतर ईशान सोनवणे , अनुष्का वानखेड़े यांनी बुद्ध , धम्म , संघ वंदना घेतली , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता सपकाळे , प्रस्ताविक सोनिबाई सोनवणे , आभार मंगला बोदवड़े यांनी केले
कार्यक्रमास उषाबाई गांगले , सुमनबाई बैसाने , वत्सला वानखेड़े , जमुनाबाई सालवे , विमलबाई भालेराव , उषाबाई सूर्यवंशी , प्रमिलाबाई सोनवणे , नूतन तासखेड़कर , कल्पना ननावरे, सुमनबाई तायड़े , कमलबाई सोनवणे , वंदना सावंत तसेच उपासक , उपासिका मोठ्या संखेने हजर होते