नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यास सुरूवात झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचे वाचन करताना महाराष्ट्रासाठी एक मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठी मोठी आर्थिक तरतूद जाहीर केली आहे. त्यांनी नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ५ हजार ९७६ कोटी तर नाशिक मेट्रोसाठी २ हजार ०९२ कोटीची तरतूद जाहीर केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत असून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. निर्मला सीतारामन यांनी सुरुवातीला केंद्र सरकारने कोरोना संकटात केलेल्या मदतीची माहिती दिली. तसंच लवकरच कोरोना प्रतिबंधक आणखी दोन लस उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं. याशिवाय त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली आहे. नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच आरोग्य सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आरोग्य सेवा क्षेत्रासाठी ६४१८० कोटींची घोषणा केली. पुढील सहा वर्षात आरोग्य सेवेचा टप्याटप्यात दर्जा सुधारला जाणार आहे. प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय स्तरातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सरकारने सहा वर्षांची योजना तयार केली आहे, असे सीतारामन यांनी आज सांगितले. त्या म्हणाल्या की नॅशनल हेल्थ मिशनला यामुळे फायदा होईल. या योजनेत ग्रामीण भारतात १७००० आणि शहरी आणि निमशहरी भागात ११००० नवीन आरोग्य सेवा केंद्र उभारली जातील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर होत आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही हा तिसरा अर्थसंकल्प आहे. तसंच पहिल्यांदाचा पेपरलेस बजेट सादर केलं जात असून मेक इन इंडिया टॅबचा वापर केला जात आहे.