जळगाव (प्रतिनिधी) आज मोदी सरकारचा सहावा अर्थसंकल्प अर्थमंत्री निलसीतारामन यांनी सादर केला. त्यावर एन एस यु आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पॅनड्यामिकचा सर्वात जास्त फटका कुणाला बसला ..? तो फक्त सर्वसामान्यांना च …परंतु सर्व सामान्यांना कुठल्याही प्रकारचा दिलासा मोदी सरकारने दिला नाही ..हजारो लाखो कोटीच्या अर्थसंकल्पात भविष्यात विकास होईल तेव्हा होईल पण आजच काय.. आज सर्वसामान्यांना आवश्यक असलेले दैनंदिन वस्तूंमध्ये कुठलीही सूट नाही महागाई जैसी थी वैसी च परिस्थिती आहे. सर्वसामान्यांना इन्कमटेक्स स्लॉब मध्ये व करा मध्ये कुठलीही सूट मिळालेली नाही, असं जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे म्हणाले.
सर्वसामान्यांकडून फक्त कर रूपात महसूल मोठ्या प्रमाणात गोळा केला जातो. तरी ही देशावर कर्ज मात्र १३६ लाख कोटीचे होते व त्याचा संपूर्ण बोजा हा सर्वसामान्य नागरिकांवर पडणार आहे. प्रति व्यक्ती १ लाख रुपये इतकं कर्ज भारताच्या प्रत्येक नागरिकावर राहणार आहे. हा एक अर्थसंकल्प फक्त मोठमोठे उद्योजक व कंपन्यांना मोठा करणारा आहे.
दरवर्षी २ कोटी रोजगार गेले कुठे ..? बेरोजगारीचा दर ७.९ % इतका वाढलेलं असतांना अर्थसंकल्पात बेरोजगारी मोदी सरकारने कायम ठेवली आहे. कोरोना काळात ८४℅ कुटुंबियांचे उत्पन्न घटले. त्यामुळे सामान्य माणसाने जगावं का मरावं अशी मोठी समस्या निर्माण झालेली असतांना असा सर्वसामान्य जनतेचा व युवकांचा भ्रमनिरास करणारा अर्थसंकल्प आज मोदी सरकारने सादर केला. त्याचे काँगेस पक्षच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.