बुलढाणा (वृत्तसंस्था) पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ट्रॅव्हल्सचा चालक दानिश शेख (रा. दारणा सागितले, गाडी जात असताना टायर फुटल्याने हा अपघात झाला. मात्र आरटीओ अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत हा दावा सपशेल खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
मोटार वाहन निरीक्षक विवेक भंडारी यांच्या मते प्राथमिक दृष्ट्या टायर फुटून अपघात झाल्याच्या गोष्टीत तथ्य वाटत नाही. बसने पेट घेतलेल्या घटनास्थळाची पहाणी केली असता पुलाचा कठडा सुरू होण्यापूर्वी १५ फुट अंतरावरील गाइड पोलला आधी बस धडकली व पुढे तशीच बसची उजवी बाजू पुलाच्या कठड्याला घासत गेली.
डिझेल टँकच्या वरील बाजूस कठड्याचे घर्षण झाल्याने तो टँक फुटला आणि डिझेल बसमध्ये पसरले, रस्त्यावरही सांडले. त्यामुळे क्षणार्धात बसने पेट घेतला असावा. टायर फुटल्यावर रिंग वाकणे अपेक्षित असते. शिवाय जेथे टायर फुटते तेथून ५० फुटांपर्यंतच बस कलंडली असती. तिथे टायरचे अवशेषही सापडतात. परंतु, इथे टायरचा अंश सापडलेला नाही. उलट टायर पूर्णपणे जळालेले दिसले.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातील सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा येथे झालेल्या अपघातात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. सिंदखेडराजा पोलिसांनी या भीषण बस अपघात प्रकरणी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या शेख दानीश याच्या विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या चालकास अटक देखील करण्यात आली आहे.