चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील सिनियर टायर्सचे मागे, भडगाव रोड टाकळी येथील एका घरातून रोकडसह सोन्या चांदीचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात भिका बुधा पाटील (वय ८३, सिनियर टायर्सचे मागे, भडगाव रोड टाकळी प्र.चा ता. चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ३ एप्रिल २०२२ रोजी सिनियर टायर्सचे मागे, भडगाव रोड टाकळी प्र.चा ता. चाळीसगाव येथे राहत असलेल्या घराचे कुलूपतोडून घरात प्रवेश करुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने मधल्या रुममधील कपाटातील सोन्या चांदीचे दागिने असा एकूण १,३८,००० रु.किं.चे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सचिन अरुण कापडणीस करीत आहेत.