चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील इच्छादेवी नगर, हिरापुर रोड येथे राहणाऱ्या माजी सैनिकांच्या घरी झालेल्या घरफोडी अज्ञात चोरटयांनी ३,०२,५०० रुपयांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दिनांक ३१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजेच्या दरम्यान, चाळीसगाव शहरातील प्लॉट नं ३१२/२/४/५/३३ इच्छादेवी नगर, हिरापुर रोड येथील घराचे मुख्य दरवाजाचे कुलुप व कळीकोंडा तोडुन घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातील एक नंबरच्या बेडरुम मधील लाकडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले ४० ग्रॅम वजनाची सोन्याची मंगळपोत असलेली साखळी, एक सोन्याची शॉर्ट पोत, एक सोन्याचे कानातले झुंबर, १५ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे कानातले झुंबर, ५ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे वेल, १२ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे नेकलेस, ६० भार वजनाचे दोन चांदीचे हातातले कडे, ५ भार वजनाचे एक चांदीचे ब्रेसलेट असा एकूण ३,०२,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी संजय प्रताप राठोड (वय ३६ रा. इच्छादेवी नगर, हिरापुर रोड, चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विशाल टकले करीत आहे.