धरणगाव (प्रतिनिधी) येथील तालुक्यातील चिंतामण मोरया मंदिर परिसरात चार ठिकाणी चोरट्यांनी अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधत घरफोडी झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या मनात भीती पसरली आहे.
शहरातील चिंतामण मोरया मंदिर मागील बाजूला असलेल्या मोरया पार्क याठिकाणी अंकुश पाटील हे रात्री वरती झोपलेले असताना खाली घरात दोन तोळे सोनं पंधरा हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लांबविली. तसेच श्री स्वामी समर्थ मंदिरा जवळ घर मालक पंधरा दिवसापासून गावाला गेलेले असून समोरासमोर असलेले संदीप पाटील व मुरलीधर बडगुजर यांच्या घरातील दागिने व कपडे, चांदीची नाणी लंपास केले आहे. व त्याच्या मागील बाजूस असलेले अशोक भंडारकर हेदेखील आठ दिवसापासून गावाला गेलेले असून त्यांचे घर फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कुलूप न उघडल्याने चोरटे आल्यात पसार झाले.
चोरीच्या प्रमाणात धरणगाव तालुक्यात वाढ झालेली असून सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असून देखील चोरट्यांना पोलिसांचा दास नाही? का असा प्रश्न या ठिकाणी रहिवासी उपस्थित करत आहेत. तर कॉलनी परिसरात पोलीस गाडी रात्री फिरत नाही, हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. पोलीस स्थानकात तक्रार नोंदणी घेणे टाळाटाळ देखील करण्यात आले. उडवाउडवीची उत्तरे देखील पोलीस स्थानकात मार्फत देण्यात आली. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे व रात्रीचे पोलीस ग्रस्त कॉलनी परिसरात वाढवण्यात यावी, अशी मागणी कॉलनी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर करत आहेत.
















