जळगाव (प्रतिनिधी) शहरातील दांडेकर नगरातील एका घरात अज्ञात चोरट्याने एलईडी टीव्हीसह सोने चांदीचे दागिने असा एकूण ४९ हजार रुपयांचा ऐवज चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल काण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, शहरातील दांडेकर नगर, प्लॉट नं १२, गट नं ३३/२ येथील घराचे अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलुप तोडुन बेकायदेशिर रित्या प्रवेशकरून एलईडी टीव्ही, १.५ किलो चांदी, ३ ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र, असा एकूण ४९,००० मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी अरविंद भास्करराव निकम (वय ६४ रा. दांडेकर नगर, प्लॉट नं १२, गट नं ३३/२ जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल काण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे करीत आहेत.