जळगाव (प्रतिनिधी) शहरातील विठ्ठलवाडी येथील रहिवासी व्यक्तीच्या शालकाच्या घरातून अज्ञात चोरट्याने ३ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात देविदास अमृत जाधव (वय ४०, रा. पिंप्राळा आनंद मित्र कॉलनी प्लॉट नं २५, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २ मार्च २०२२ रोजी दुपारी २.०० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटयाने देविदास जाधव यांचे शालक नामे पंकज मगन मेहेते यांच्या बंद घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून घरातील बेडरूममध्ये ठेवलेले गोदरेज कंपणीचे कपाट उघडुन कपाटात ठेवलेलया चाव्याच्या वापर करून १० तोळे वजनाचे सोने, २ कानातील कर्णफुलाचे असलेले दोन जोडे प्रत्येकी १ तोळा वजनाचे, ५ ग्रॅम वजनाच्या लहान मुलाचे व मुलीच्या कानातील सोन्याच्या बाळ्या, ६ हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण ३ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल शालक याचे संमतीवाचुन लबाडीच्या इरादयाने घरफोडी करून चोरून नेला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहेत.