चोपडा (प्रतिनिधी) वेले येथील शिवराम नगरमधील बंद घराचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून चोरी करण्यात आली. चोरटे फोर व्हीलर गाडीतून आले होते. गावातील काही जागृत लोकांनी चोरट्यांना पकडून पोलीस पाटील व रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या ताब्यात दिले. परंतू पोलिसांनी चौकशी करून चोरट्यांना सोडून दिल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
वेले येथील संतोष सुकलाल कुंभार हे पूर्ण परिवार निजामपूर येथे वीटभट्टीच्या कामानिमित्त गेले होते. घरात कोणीही नसल्याचे संधी साधत चोरांनी फोरव्हीलरवर येऊन डल्ला मारण्याच्या कट रचला होता. या घराचे कडी कोयंडा कटरने कापून घरात शिरल्यावर सामान अस्तव्यस्त करून खालच्या मजल्यावर व वरच्या मजल्यावर जाऊन चोरी केली.
यावेळी घराच्या मागील बाजूस असेलेले वासुदेव भिकन पाटील यांच्या चोरीचा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी संतोष शालिक पाटील यांना फोन करून बोलवले. परंतू तोपर्यंत चोरांनी पळ काढला होता. दरम्यान, कालच्या दिवशी भरपूर पाऊस झाल्याने कारच्या टायरच्या निशाणीवरून चोर कुठे गेले असावेत?, याच्या अंदाज लावून गावातील राम मंदिर चौकात या चोरट्यांना पकडण्यात यश आले. यानंतर पोलीस पाटील आणि आबाजी पाटील यांच्यासमोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यानंतर पोलिसांनी चौकशी करून या दोघं चोरट्यांना सोडून दिल्याने वेले गावातील नागरिक हे संताप व्यक्त करत होते. संतोष सुकलाल कुंभार यांच्या घरातून चांदीचे काही दागिने व पंधरा ते सोळा हजार रुपये रोख अशा पद्धतीची चोरी झाली आहे. चोरटे हे फोरव्हीलरने रात्री दोनच्या सुमारास वेळेस आले होते. वरील माहिती वासुदेव पाटील, संतोष पाटील व बीआरएस कार्यकर्ते दीपक पाटील यांनी पत्रकारांना दिली. यावर पोलीस निरीक्षक के.के पाटील यांना विचारले असता यांनीही दुजोरा दिला.