TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्यवसाय कर, मार्केट फी रद्द करावी !

जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाची मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
March 6, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) देशात जीएसटी कायदा आणताना सरकारने स्थानिक सर्व कर रद्द करण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. परंतु इतकी वर्षे उलटूनही अद्याप ते कायदे रद्द झालेले नाहीत. राज्य सरकारने व्यवसाय कर, मार्केट फी रद्द करावी तसेच पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करून या वर्षीचा अर्थसंकल्प जाहीर करावा अशी विनंती जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललित बरडीया यांनी मुख्यमंत्री, अर्थमंत्री व पालकमंत्र्यांकडे केली आहे.

राज्याचा अर्थसंकल्प दि.८ मार्च रोजी सादर केला जाणार आहे. जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, अर्थमंत्री ना.अजीत पवार, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, फामचे अध्यक्ष विनेश मेहता यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, युतीशासनाच्या कार्यकाळात शिवसेनेच्या नेतृत्वात तत्कालीन सरकारने सर्वंकष विचार करून ऐतिहासिक निर्णय घेत स्थानिक कर आणि जकात कर हे दोन्ही कर रद्द केले होते. मोठा ताण कमी करून कर प्रक्रिया सुलभ करणारा तो निर्णय असल्याने व्यापारी बांधवांनी त्याचे मनापासून स्वागत केले होते. अशाच काही धडाडीच्या निर्णयांची आपल्याकडून जनतेला व व्यापारी बांधवांना अपेक्षा आहे. सरकारने कर घ्यावा याबद्दल दुमत नाही. परंतु त्यामध्ये एकसूत्रता व सुलभता असावी ही सर्वांची अपेक्षा रास्त आहे.

READ ALSO

प्रभाग क्र. १३ मधील नागरी समस्यांबाबत महापौरांकडे तातडीच्या बैठकीची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

मागण्या खालीलप्रमाणे

१. व्यवसाय कर : सदरहू कायदा हा बेरोजगारांना रोजगार भत्ता देण्यासाठी लागू करण्यात आला होता. मात्र वर्तमान परिस्थितीमध्ये या कायद्याचे औचित्य संपुष्टात आले आहे, तरीही शासनातर्फे व्यवसाय कर आकारण्यात येत आहे. ७५०१ ते १०००० वरील पगारदारांना अजूनही व्यवसाय कर भरावा लागतो. खरेतर इतक्या प्रचंड महागाईच्या परिस्थितीत अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या पगारदार व व्यावसायिकांना व्यवसाय कर आकारणे मुळीच संयुक्तिक नाही.

२. मार्केट फी : ज्याप्रमाणे शासनाने स्थानिक कर व जकात कर रद्द करून स्थानिक संस्थांना अनुदान देणे सुरु केले त्याचप्रमाणे आपल्या नेतृत्वाखालील सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आकारण्यात येणारी ‘मार्केट फी’ रद्द करून बाजार समितीला राज्य शासनाद्वारे अनुदान द्यावे. या निर्णयाने शेतकरी, व्यापारी व ग्राहक यांच्या व्यवहारात अधिक पारदर्शक येईल आणि त्यामुळे व्यवहारामधील क्लिष्टता कमी होईल. ही काळाची गरज झाली आहे.

३. पेट्रोल डिझेलवरील कर : अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यात पेट्रोल तसेच डिझेल यांवर खूपच जास्त कर आकारला जात आहे. अतिमहागाईच्या या काळात अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त कर भरणे सर्वसामान्य जनतेला अजिबात परवडण्यासारखे नाही. तरी महाराष्ट्र सरकारने पेट्रोल व डिझेल यावरील कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा.

वित्तीय तूट ‘जीएसटी’मध्ये भरून काढावी

वरील कर रद्द केल्याने निर्माण होणारी वित्तीय तूट शासनाने पारदर्शक ‘जीएसटी’मध्ये आवश्यक वाढ करून भरून काढावी, पण व्यापारी व सर्वसामान्य ग्राहक तसेच नागरिकांच्या दैनंदिन व्यवहार प्रणालीमध्ये डोकेदुखी ठरत असलेले वरील सर्व कर महाराष्ट्र शासनाने तात्काळ पूर्णपणे रद्द करावे, अशी विनंती जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

प्रभाग क्र. १३ मधील नागरी समस्यांबाबत महापौरांकडे तातडीच्या बैठकीची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

February 6, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
Next Post

शिवसेना महानगरतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाईन कोविड लस नोंदणी मदत केंद्र !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 जुलै 2025 !

July 20, 2025

जळगाव जिल्हा दुध संघाने केली दुध खरेदी दरात वाढ

October 22, 2022

धरणगाव पोलिसांचे शांततेचे आवाहन

November 14, 2021

‘पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंकडे थेट व्होल्वो बस चालवायला दिली, विनाअपघात प्रवास सुरूय’ : ना. गुलाबराव पाटील

October 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group