नंदुरबार (प्रतिनिधी) शहादा येथे दोन लाखाची आगाऊ रक्कम घेवून १० टन हिरवी मिरची न पाठवता व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुध्द म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यापारी चैतन कन्हैयालाल ढोंढरे (वय २४, रा.मालेगाव जि. नाशिक) यांना दिपक हनुमान सागट, सादीक पाश्या अब्दुल रहिम, पंकजकुमार पटेल (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) या तिघांनी ग्रिनी चिली प्लॉटमधील १० टन माल पाठवितो असे आमिष दिले. तसेच २ लाख रूपये आगाऊ घेवून सदर माल न देता व्यापारी चैतन्य ढोंडरे यांची फसवणूक केली. याप्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात दिपक सागट, सादीक पाश्या अब्दुल रहिम, पंकज पटेल या तिघांविरुध्द चैतन्य ढोंडरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















