धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नव्याने स्थापन झालेली डॉ.हेडगेवार नगर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे निवडून आलेल्या नवनियुक्त सरपंच व सदस्यांचा सत्कार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नुकतेच संघटात्मक जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी जळगाव येथे डॉ.हेडगेवार नगर ग्रामपंचायतीचे नवनियुक्त सरपंच सविता धनराज सोनवणे,व सद्स्य मंगलाताई परशुराम महाजन,शिलाताई अनिल देशमाने,शाम पाटील,चंदन दिलीपराव पाटील,संभाजी शंकररराव सोनवणे, स्वातीताई मंदार चौधरी, शितलताई महेंद्र पवार,चंदन चौधरी इत्यादींचा सत्कार केला. याप्रसंगी भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष अॅड. संजय महाजन, जिल्हा चिटणीस प्रमिलाताई रोकडे, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, महिला तालुकाध्यक्ष रेखाताई पाटील, उपाध्यक्षा दिक्षाताई गायकवाड, मनिषाताई लांबोळे, जिल्हामीडिया प्रमुख टोनी महाजन यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.















