भुसावळ प्रतिनिधी । उत्तर प्रदेशात अलीगढ येथील हाथरस येथे जातीयवादी मानसिकतेतून घडलेल्या अत्याचाराबाबत शहरात ‘कॅडल मुक मार्च ‘काढण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणेचे निवेदन ‘भिम आर्मी भारता एकता मिशन’ तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यानुसार आज सायंकाळी ५ वाजता कॅडल मुक मार्च काढण्यात आला.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपणास विनंती पुर्वक सुचित करू इच्छितो की गेल्या महिन्यातील 14/9/2020 रोजी हाथरस उत्तर प्रदेश येथे मनिषा वाल्मिकी गावाच्या तरुणी सोबल जातीयवादी भावना मनाशी बाळगून ठाकुर समाजाच्या 4 नराधमांनी आळी पाळिने अमानुष असा मानवतेला काळीमा फासणारा मानवतेला कलंकित करणारा जन सामान्य माणसाचे हृदय पिळवटून टाकणारा असा बलात्काराचा दुर्दैवी प्रकार समोर आलेला आहे.त्या प्रकरणी महाराष्ट्रातुन बर्याच सामाजिक संघटना समोर आलेल्या आहेस आनी प्रती दिन महाराष्ट्रातुन विविध ठिकाणी मोर्य आंदोलन सुरु आहेत. त्या अनुषंगाने किंवा आमची नैतीक जबाबदारी म्हणूण आम्ही निवेदन कर्ते भिम आर्मी जिल्हा परिवार जळगाव च्या माध्यमातून आपणास भुसावळ शहरात ‘कंडल मुक मार्च ‘काढण्यासाठी आपली परवानगी पाहिजे. मुक मार्च मधे कुठल्याही प्रकारचं शासकीय नियमांचे उल्लंघन होणार नाही याची सर्वोतोपरी जबाबदारी आमची राहील..शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचे आम्ही काटेकोर पणे पालन कर.आम्ही लोकशाहीचे पुरस्कर्ते असल्यामुळे कायदा व सुव्यस्था कशी अबाधित राहील यावर आमचा कान राहील.
“कॅडल मुक मार्थ दि. 03/10/2020 रोजी वेळ संध्या 5.00 वा ठिकाण गांधी पुतळा यावल नाका ते आरतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप केला जाईल. घटनेचे गांभीर्य बघता आम्ही आमच्या भावनांना आवर घालुन शांतताप्रिय माध्यमाने या निंदनीय घटनेचा निषेध करतोय.














