चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील दोन ठिकाणी अज्ञात चोरटयांनी घरफोडी करून रोख रक्कम लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव व शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात प्रभूलिंग मन्मथ जंगम (वय ४० रा. नेताजी चौक चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २० जून २०२२ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने २२ हजार १५० रूपये रोख रक्कम जंगम कटलरी स्टोअर्स नावाच्या बंद दुकानात प्रवेश करून चोरी करून नेले. याप्रकरणी चाळीसगाव व शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना राहुल सोनवणे हे करीत आहेत.
सानेगुरुजी नगरातील अपार्टमेंटमधील खोलीतून रोकड चोरी
यासंदर्भात विलास रघुनाथ चव्हाण (वय २४ रा. सानेगुरुजी नगर समर्थ पार्क अपार्टमेंट चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २१ जून २०२२ रोजी अज्ञात चोरट्याने विलास चव्हाण यांच्या राहत्या बंद घरात प्रवेश करून कडीकोंडा तोडून २७ हजार रुपये रोख रक्कम चोरी करून नेली. याप्रकरणी चाळीसगाव व शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ अभिमन पाटील हे करीत आहेत.