ब्राझिलिया (वृत्तसंस्था) वॉशिंग मशीनमुळे एका महिलेचा जीव गेला आहे (Woman death due to Washing machine). कपडे धुताना वॉशिंग मशीनचा करंट लागल्याने या महिलेचा मृत्यू झाला आहे. हि धक्कादायक घटना ब्राझीलमधील आहे.
२७ वर्षांची टॅस ़डी ओलिवेरा रोस्ट एका ४ वर्षाच्या मुलीची आई आहे. घरातली सर्वच काम ती करायची. नेहमीप्रमाणे ती कपडे धुवायला गेली. वॉशिंगमध्ये तिने कपडे टाकलं. पण यावेळी अचानक आपल्याला मृत्यू गाठेल याचा तिने स्वप्नातही विचार केला नसेल. तिचा बॉयफ्रेंड विलिअम बोटेगा त्यावेळी बाहेर गेला होता. घरी तो परतला तेव्हा गर्लफ्रेंड ओलिबेरा जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडल्याचं त्याला दिसलं. त्याने तिला आवाज देऊन शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या शरीरात कोणतीच हालचाल होत नव्हती. त्याने लगेच आपात्कालीन क्रमांकावर फोन केला. पण काहीच उपयोग झाला नाही. कारण तिचा मृत्यू झाला होता.
तपास केल्यानंतर ऑलिवेराच्या मृत्यूचं कारण वॉशिंग मशीन ठरल्याचं आढळून आलं. ती लाऊन्ड्री एरिआमध्ये पडलेली सापडली आणि त्यावेळी ती कपडे धुण्याचं कम करत होती. त्यामुळे वॉशिंग मशीनचा करंट लागल्याने तिचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मशीनच्या तारेचा झटका तिला लागला असावा, असा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान याचा पुढील तपास सुरू आहे.