जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा तथा विद्यमान संचालिक रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते गजानन मालपुरे यांनी देखील निषेध केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक लेखी निवेदन जारी केलं असून यात त्यांनी रोहिणीताई खडसे यांच्यावरील झालेला हल्ला हा भ्याड आणि निषेधार्ह असून याची सीबीआयच्या माध्यमातून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, रोहिणीताई खडसे यांच्या वर ज्या भ्याड पध्दतीने हल्ला करण्यात आला आहे त्याचा जाहिर निषेध करत आहे. सामाजिक जीवनात काम करणाऱ्या महिलांनावर अश्या पध्दतीने भ्याड हल्ले होत राहिले सामाजिक काम करण्यासाठी महिला पुढे येणार नाहीत त्यामुळे ह्या हल्ल्यातील संशयित असलेले गुन्हेगार हे नुसते राजकीय पक्षाशी संबंधित नसुन जबाबदार पदाधिकारी आहेत व रोहिणीताई ह्या एकनाथराव खडसे यांच्या कन्या आहेत. ह्या हल्ल्यामागे नेमके काय राजकारण आहे याचा खरा सुत्रधार समोर येण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दला समोर कठीण परीक्षा राहणार आहे. यामुळे यातुन गुन्हेगारांना शासन होण्यासाठी कुठंतरी दबावाखाली तपास होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. यामुळे संबंधीत प्रकरणाचा तपास निःपक्षपाती होण्यासाठी सीबीआय चौकशी करण्याची आवश्यकता आहे. यामुळे या हल्ल्याचा तपास त्वरित सीबीआयकडे वर्ग करून योग्य तपास होऊन गुन्हेगारांना शासन करण्यात यावे अशी मागणी गजानन मालपुरे यांनी या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.