TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अश्लील सीडी…पोलिसांची छापेमारी आणि खडसेंचा खळबळजनक दावा, जाणून घ्या…’त्या’ सीडीबाबत आतापर्यंतच्या सर्व घडामोडी ! (UPDATED)

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2022
in गुन्हे, जळगाव, राजकीय, राज्य
1
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सर्वप्रथम एका माजी मंत्र्यांच्या पीएची अश्लील सीडीबाबत धक्कादायक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता चक्क ‘ती’ सीडी सहा महिन्यांपूर्वी पोलिसांकडे दिली आहे. एवढेच नव्हे तर त्याबाबत चौकशी सुरु असल्याचे सांगून खडसेंनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिलीय. परंतू पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाने माझा मित्र आणि नातेवाईकाकडे छापा टाकून ‘ती’ सीडी मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रफुल्ल लोढा यांनी काही महिन्यांपूर्वी केला होता. तर दुसरीकडे आतापर्यंत तीन लोकांनी सीडी आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. जाणून घ्या….’त्या’ कथित अश्लील सीडीबाबत आतापर्यंतच्या सर्व घडामोडी !

 

READ ALSO

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

काय म्हणाले होते खडसे आणि लोढा

 

एका माजी मंत्र्यांच्या पीएच्या अश्लील व्हिडीओ क्लिपची सीडीबाबत सर्वात प्रथम एकनाथराव खडसे यांनी जाहीर वक्तव्य केले होते. या सीडीबाबत विचारायचे असेल तर जामनेरच्या प्रफुल्ल लोढा यांना विचारा असे वक्तव्य करून खडसे यांनी खळबळ उडवून दिली होती. यानंतर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल लोढा यांनी यांनी ‘द क्लिअर न्यूज’ला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीत ‘त्या’ अश्लील व्हिडीओ क्लिपसह अनेक गंभीर गोष्टींवर धक्कादायक खुलासे केले होते. ‘त्या’ क्लिप विदेशात सुरक्षित आहेत. त्यामुळे माझ्या शरीराचे तुकडे-तुकडे केले तरी पापाचा घडा फुटेलच. मला ब्लॅकमेलिंग करायचे राहिले असते तर जनतेसमोर तथ्य मांडली नसती. रात्रीच्या अंधारात चिरीमिरी घेऊन शांत बसलो असतो. परंतू मला अनैतिक प्रवृत्ती संपवायची आहे. अगदी त्यांच्यात हिंमत असेल तर मी त्यांच्या घराच्या गच्चीवर सुद्धा समोरा-समोर चर्चा करायला तयार आहे. त्यामुळे मला त्रास दिला तर अशा गोष्टी उघड करेल की महाराष्ट्र हादरेल, अशा शब्दात प्रफुल्ल लोढा यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह त्यांचे समर्थक रामेश्वर नाईक यांना इशारा दिला होता.

 

मित्र आणि नातेवाईकाकडे छापेमारीचा लोढा यांचा आरोप

 

गिरीश महाजन व रामेश्‍वर नाईक यांच्या कथित गैरकृत्याची फाईल व सीडी मिळविण्यासाठी बीएचआर पंतसंस्थेचा चौकशीचा बहाणा करून पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाने एकनाथराव खडसे यांच्या दबावाने आपले मित्र व माझ्या चुलत भावाच्या घरावर धाड टाकली, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रफुल्ल लोढा यांनी ऑगस्ट २०२० मध्ये एका पत्रकार परिषदेत केला होता.

 

सिल्लोड आणि मुंबईला छापेमारी

प्रफुल्ल लोढा यांनी आरोप करताना पुढे म्हटले होते की, बीएचआरशी आपला संबंध नाही, मात्र त्यांचा बहाणा करून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या दबावामुळे पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी माझे मित्र सुनील कोचर आणि मुबंईला माझे चुलत भावाचे लोढा भवन येथे झाडाझडती घेतली. न्यायालयाची कोणतीही परवानगी नसताना पारस ललवाणी यांना घेऊन सिल्लोड येथे सुनील कोचर यांच्या घराची झडती घेतली. महाजन व नाईक यांच्यासंबंधी सीडी मिळविण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप लोढा यांनी केला होता.

 

सीडी आपल्याकडेही आहेत ; अॅड विजय पाटील यांचा दावा !

माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आपला छळ केला आहे. तीन वर्षापूर्वी ते मंत्री असल्याने त्यांचा दबाव होता. त्यामुळे पोलीसांनी आपली तक्रार घेतली नसती याची आपल्याला जाणीव होती. त्यामुळे आज गुन्हा दाखल केला आहे. मात्र या सर्व गुन्ह्याचे आपल्याकडे पुरावे आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या कृत्याच्या आपल्याकडे ‘सीडी’आहेत वेळ आल्यास आपण त्याही दाखविणार आहोत. असे इशारा तक्रारदार अॅड विजय भास्कर पाटील यांनी डिसेंबर २०२० मध्ये जळगावात एका पत्रकार परिषदेत दिला होता. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या ‘सीडी’असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यासह राज्यात सुरु असतांना त्याबाबत बोलतांना विजय पाटील म्हणाले होते, की आमच्याकडे महाजनांच्या विरूद्धचे सर्व पुरावे आहेत. त्यांच्या चर्चेत असलेल्या ती सीडी तसेच पेन ड्राईव्ह आहेत. वेळप्रसंगी आपण तेही दाखविणार आहोत, असे सांगून अॅड. विजय पाटील यांनी देखील प्रचंड खळबळ उडवून दिली होती.

 

खडसेंनी सीडी पोलिसांकडे दिली की छापेमारीत सापडली?

 

गैरकृत्याच्या सीडीबाबत जामनेरचे प्रफुल्ल लोढा यांच्या सर्व माहिती आहे. परंतू मध्यंतरी त्यांनी पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाने सीडी मिळवण्यासाठी धाड टाकून आपले मित्र आणि नातेवाईकाकडे धाड टाकल्याचा आरोप केला होता. दरम्यान, या छापेमारीत पोलिसांनी लॅपटॉप,पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिक्स जप्त केल्याची चर्चा होती. तर या तिघांपैकी एका वस्तुत त्या गैरकृत्याच्या सीडीतील व्हिडीओ सापडल्याची चर्चा रंगली होती. परंतू या चर्चेच्या सत्यतेबाबत अद्यापही अधिकृत कुणाकडे काहीही माहिती नाहीय. परंतू आता खडसे यांनी सीडी पोलिसांकडे दिल्याचे सांगितल्यामुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. लोढा यांनी पोलिसांनी छापेमारी केल्याचा आरोप केला तर खडसे यांनी ती सीडी पोलिसांकडे दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे खडसेंनी सीडी पोलिसांकडे दिली की छापेमारीत सापडली?, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. दरम्यान, एवढेच नव्हे तर खडसेंनी ती सीडी नेमक्या कोणत्या पोलिसांकडे दिलीय? याबाबत कुणाकडेही निश्चित माहिती नाहीय. परंतू खडसेंनी ती सीडी पुणे पोलिसांकडे दिली असल्याची चर्चा जळगावात सुरू आहे.

 

मी गंमतीने बोललो होतो पण… 

भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात फेब्रुवारी २०२१ येऊन राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी म्हटले होते की, सीडी लावण्याबाबत मी गंमतीने बोललो होतो. पण खरंच माझ्या मागे ईडी लावलीत, आता सीडी लावण्याचे काम अजून बाकी आहे. राष्ट्रवादी संवाद यात्रेला संबोधित करताना एकनाथ खडसे यांनी हा इशारा दिला होता.

 

सीडी नक्की येणार : खडसे 

खडसे यांनी पुन्हा एकदा कथित सीडीला घेऊन पुण्यात शुक्रवार (४ फेब्रुवारी) रोजी सूचक इशारा दिलाय. माझी सीडी नक्की येणार आहे. आता काढून काय निवडणुकीवर परिणाम होणार नाही. वाट बघा, असं सूचक विधान खडसे यांनी केलंय. खडसे यांच्या या विधानामुळे आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, लोढा, खडसे आणि अॅड. पाटील  अशा तीन लोकांनी सीडी आपापल्याकडे असल्याचा दावा आतापर्यंत केला आहे.

 

विजय वाघमारे (9284058683)

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: SEX CD JALGAON

Related Posts

गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
Next Post

धरणगाव तालुक्यात झुडुपामध्ये आढळले अर्भक !

Comments 1

  1. mahesh gopal patil says:
    5 years ago

    बहूत खुब गिरीष माहाजन चा पान उतारा झाला च पाहीजे मातला आहे बिजे पी च्या जारावर तसाच फडवनीस पण

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथील विक्रम ग्रंथालय येथे आरोग्यभारतीतर्फे धन्वंतरी पूजन !

November 13, 2020

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 08 जानेवारी 2026 !

January 8, 2026

महावितरणने मागणी केलेली अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी सहा मासिक हप्ते मिळू शकतात : प्रताप होगाडे

April 24, 2022

पीएम स्वनिधी योजनेंतर्गत “मैं भी डिजिटल ४.०” मोहिमेचा लाभ घेण्याचे पथविक्रेत्यांना आवाहन !

February 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group