धरणगाव (प्रतिनिधी) समाजात राष्ट्रीय एकोपा निर्माण झाला पाहिजे, या हेतूने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन धरणगावचे पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले यांनी केले. ते गणेश मंडळांच्या आयोजित बैठकीत बोलत होते.
धरणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच सदस्यांची नुकतीच धरणगाव पोलीस स्थानकात बैठक झाली. आगामी गणेशोत्सव, ईद, दहीहंडी आदी सण शांततेत व कायद्याचे पालन करून पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले तसेच उपनिरीक्षक संतोष पवार यांनी मार्गदर्शन केले.
यंदाचा गणेशोत्सव हा जनजागृती गणेशोत्सव म्हणून साजरा करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक ढमाले यांनी केले. चोरी, सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासंदर्भात गणेश मंडळाच्या माध्यमातून जनजागृती करावी, असेही मार्गदर्शन केले. बैठकीला पोलिस हवालदार मिलिंद सोनार, विजय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल वैभव बाविस्कर, विनोद संदानशिव, श्यामराव मोरे उपस्थित होते..