अमळनेर (प्रतिनिधी) येथील भगिनी मंडळ संचालित आदर्श प्राथमिक शाळेत गुरू पौर्णिमा उत्सवात साजरी करण्यात आली.
यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्त भगिनी मंडळ संचालित आदर्श प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विविध श्लोक, गाणी, प्रार्थना, व गुरू महिमा सांगणारे भाषणे सादर केली. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका मंगला सोनवणे व ज्येष्ठ शिक्षिका विजया गायकवाड यांनी बक्षीस वितरण केले, तर शुभांगी कुलकर्णी यांनी गुरू महिमा सांगणारे गीत सादर केले.सविता देशमुख यांनी सूत्रसंचलन केले. गुरुपौर्णिमा निमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षिकांनी सहकार्य केले.