धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात पाळधी बु व खु गावात पल्स पोलिओ दिवस साजरा करण्यात आला. 0 ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील व सभापती मुकुंदराव नंनवरे यांच्या हस्ते दोन थेंब जीवनाचे बालकांना देऊन पोलिओ दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी आशा वर्कर माधुरी, विलास चौधरी, नीता अनिल ठाकूर, मच्छिद्र पाटील, भगवान मराठे, युवासेना शहर प्रमुख आबा माळी, महेश पाटील, गोकुळ नाना, कालू शेख, सुभाष नंनवरे, सादिक देशमुख आदी उपस्थित होते.